धान्यापासून मद्यार्कनिर्मितीच्या विरोधात कार्यरत असलेल्या श्री. सचिन तिवले यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करुन सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांचे स्वार्थ यात कशाप्रकारे गुंतले आहेत तसेच शासनाची ही योजना किती पोकळ आहे हे आकडेवारीतून दाखवून दिले आहे. ते सध्या बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन या संस्थेअंतर्गत छत्तीसगढ राज्यात पाणीव्यवस्थापन क्षेत्रात काम करत आहेत.
माहितीचा अधिकार कायदा २००५
सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घालणसाठी, तसंच लोकांना हवी ती माहिती उपलब्ध करून खरी लोकशाही राबवण्याच्या हेतूने माहितीचा अधिकार कायदा २००५ अस्तित्वात आला.
केंद्र सरकार, संघराज्य-क्षेत्र प्रशासन, राज्यप्रशासन यांच्या नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच सरकारकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या निधी पुरवल्या जाणाऱ्या अशासकीय संस्था, मंत्रालय, महानगरपालिका, नगरपालिका, कलेक्टर, रेल्वे, न्यायालये, एस.टी., वीज वितरण कंपनी, रेशनिंग कार्यालय, ग्रामपंचायत, तहसील, पोलीस, शाळा, महाविद्यालय, पासपोर्ट, इन्कम टॅक्स, प्रॉविडण्ट फंड, म्हाडा, पोर्ट ट्रस्ट, पोस्ट इत्यादी कार्यालयांतून या कायद्यांतर्गत माहिती मागवता येते.
या कायद्याचा उपयोग काय?
सजग नागरिक म्हणून या अधिकाराचा वापर करून अनेक सामाजिक तसेच वैयक्तिक बाबींमधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास योग्य ती माहिती मिळविता येते. या अधिकारातंर्गत आपल्या घरी गॅस सिलेंडर वेळेवर येत नसेल तर हिंदुस्तान पेट्रोलियमलाच- आमच्या भागातील डीलरला किती गॅस सिलेंडर देता? आमचे बुकींग कधी झाले? घरी गॅस कधी दिला? इतर लोकांना गॅस कधी आणि किती दिले? हे प्रश्न विचारू शकता. यातून सिलेंडरची अनाधिकृत विक्री कोठे व कशी केली जात आहे याचा सुगावा लागतो. तसेच या महितीद्वारे तक्रार नोदंवून अशा प्रकारचा भ्रष्ट्राचार रोखण्यास मदत होते.
माहिती म्हणजे काय?
माहिती म्हणजे कोणत्याही सरकारी विभागातील सर्व प्रकारचे दफ्तर, कागदपत्रे, टिपण, ई-मेल, एखाद्या अधिकाऱ्याने स्वत: नमूद केलेले मत, लिखित स्वरूपातला आदेश, वर्तमानपत्राद्वारा प्रसिद्ध केलेली माहिती, परिपत्रक, अध्यादेश, नोंदवही, कोणताही लिहिलेला कागद, कच्चे टिपण, मेमो, पत्रव्यवहार तसंच खासगी संस्थ- कंपन्यांकडून सरकार मिळवू शकणारी माहिती.
वरील माहिती आपण नागरिक छायांकित प्रतीच्या स्वरुपात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अथवा छापील स्वरूपात मिळावू शकतो. तसंच सरकारी कामाची, अभिलेखांची, कागदपत्रांची पाहणी व तपासणी करू शकतो.
माहिती कशी, कोणाकडून व किती दिवसात मिळेल?
सरकारने प्रत्येक कार्यालयामध्ये माहिती अधिकारी व सहायक माहिती अधिकारी यांची नियुक्ती केली पाहिजे. आपले नाव, पत्ता आदी तपशील आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीचे स्वरूप लिहिलेला अर्ज लिहून माहिती अधिकाऱ्यास पोस्टाने अथवा व्यक्तिश: सादर करावा व त्याची पोच घ्यावी. (सोबतच्या नमुना अर्ज क्र. १ ची मदत घ्या.)
माहिती अधिकारी माहित नसल्यास खातेप्रमुख-विभागप्रमुखास अर्ज करावा. राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील विभागांना अर्ज करताना १० रूपयांचा कोर्ट फी स्टॅम्प अर्जावर लावावा. अथवा रोख दहा रूपये भरून पोच व पावती घ्यावी. केंद्र सरकारच्या खात्यांकरिता अर्ज करताना दहा रूपये रोख भरावेत.
अर्ज मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत करता येतो. निरक्षर व अपंग व्यक्तींना माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकारी मदत करतात.
माहिती अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यास माहिती ३० दिवसात देणे बंधनकारक आहे. व्यक्तीच्या जीविताशी व स्वातंत्र्याशी संबंधित माहिती ४८ तासांमध्ये दिली पाहिजे. सहाय्यक अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यास पाच दिवस अधिक लागतील.
माहिती कशासाठी हवी आहे, हे नमूद करण्याची आवश्यकता नाही. कारण सार्वजनिक/ शासकीय कार्यालयातील माहिती मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे, अशी या कायद्याची भूमिका आहे.
अधिक माहितीसाठी धान्यापासून मद्यार्कनिर्मितीच्या योजेनेतील काही माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना
प्रती,
माहिती अधिकारी,
.........................................................
........................................................
........................................................
........................................................
विषय: माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या
अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी अर्ज
महोदय,
महाराष्ट्र शासनाने
धान्यापासून मद्यार्क निर्मितीची धान्याधारित आसवनी व एकात्मिक घटक अर्थसहाय्य – 2007 ही योजना सुरु केलेली आहे. त्यासंदर्भात मला खालील माहिती कृपया देण्यात यावी.
1.
या योजने अंतर्गत आपल्या
जिल्ह्यात किती प्रकल्प सुरु झाले आहेत. त्यांची नावे देण्यात यावीत.
1.
2.
किती प्रकल्पांनी प्रत्यक्ष
उत्पादन सुरु केले आहे. त्यांची नावे देण्यात यावीत.
3.
प्रत्यक्ष उत्पादन सुरु
केलेल्या प्रत्येक प्रकल्पाची ......................................... या
तारखेपर्यंतची खालील माहिती देण्यात यावी.
3.
3.1
प्रकल्पाने प्रत्यक्ष
उत्पादनास कधीपासून सुरुवात केली.
3.2
प्रकल्पाने सुरु झाल्यापासून
................................... या तारखेपर्यंत किती मद्यार्काचे उत्पादन
केले. आणि मद्यार्क कोणत्या प्रकारचे होते?
3.3
सुरु झाल्यापासून आतापर्यंत
प्रकल्पाने किती धान्य वापरले? ते धान्य कोणत्या प्रकारचे होते? (उदा. गहू, ज्वारी
इ.) काय भावाने धान्य खरेदी करण्यात आले?
3.4
धान्याची खरेदी व्यापार्यांकडून
करण्यात आली की प्रत्यक्ष शेतकर्यांकडून करण्यात आली?
3.5
वापरलेले धान्य कोणत्या गुणवत्तेचे
होते? (उदा. खाण्यायोग्य अमुक टन, खाण्या अयोग्य अमुक टन)
3.6
कारखान्याला कीती सबसिडी
मिळाली. व सबसिडी मिळाल्याची तारीख काय होती?
3.7
प्रकल्पातून दिवसाला सरासरी
किती दारू उत्पादन होते व त्यासाठी किती टन धान्य सरासरी वापरले जाते?
3.7
4.
मला माहिती रजिस्टर पोस्टाने
पाठविण्यात यावी. त्यासाठी लावणारा खर्च दिला जाईल.
5.
कृपया माहिती असलेल्या
छायांकीत प्रती पाठवताना प्रत्येक प्रतीवर संबधित खात्याचा शिक्का व सही करून
माहिती पाठविण्यात यावी.
सूचना
1.
माहितीचा अधिकार अधिनियम
2005 च्या सेक्शन 6 (3) नुसार आपल्या कडे जर वरील माहिती किंवा माहितीचा
काही भाग उपलब्ध नसेल किंवा ती माहिती अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी
अधिक संबधित असेल तर हा अर्ज किंवा अर्जाचा काही भाग योग्य सार्वजनिक
प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करावा. कायद्यांवये हे ह्स्तांतरण पाच
दिवसांमध्ये होणे आवश्यक आहे. तसेच या हस्तांतरणाविषयी अर्जदारास म्हणजे मला सूचित
करणे आवश्यक आहे.
2.
त्यामुळे कृपया “....... ही माहिती या कार्यालयाशी संबधित नसल्याने
आपण सक्षम अधिकार्या कडून प्राप्त करून घ्यावी.” असे मला कळवू नये. ते कायद्याचे उल्लंघन होईल.
आपला विश्वासू,
(.........................................)
संपर्कासाठी अर्जदाराचा पत्ता:
नाव:
.................................................................................................................
पत्ता:
.................................................................................................................
.................................................................................................................
.................................................................................................................
………………………………………………………………………………………………………………………………………..
मोबाईल नं: ...............................................................
ई-मेल : ....................................................................
(साभार: हा लेख प्रथमच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.. http://pune.thebeehive.org/content/2274/5043
http://pune.thebeehive.org/content/2274/5044)
Good work
ReplyDeleteGood work
ReplyDelete